breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रराजकारण
#CoronaVirus: …आणि मी कोरोना पॉझिटिव्ह झालो: राज्यमंत्री विश्वजीत कदम
सांगली: काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र कोणतीही लक्षणं नसल्याने पुण्यातील घरातच ते होम क्वारंटाईन झालेले आहेत. “धावपळीच्या कारभारात योग्य ती वैद्यकीय खबरदारी घेत होतोच. परंतु अखेर मला कोरोना संसर्ग झालाच! थोडा ताप आणि अंगदुखी, अशी सौम्य लक्षणे दिसू लागल्याने काल चाचणी करुन घेतलेली होती. आज त्याचा अहवाल आला आणि मी कोरोना पॉझिटिव्ह झालो” अशी माहिती विश्वजीत कदम यांनी ट्विटरवरुन दिलेली आहे.
राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी विश्वजीत कदम यांना सदिच्छा दिलेल्या आहेत. “विश्वजीत कदमजी आपण कोरोनावर मात करुन लवकर बरे व्हा. माझ्या सदिच्छा आपल्या सोबत आहेत.” असे ट्वीट रोहित पवार यांनी केलेले आहे.