breaking-newsताज्या घडामोडीराजकारण
#CoronaVirus | अमित देशमुखांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह
मुंबई | कोरना व्हायरसने भारतामध्ये थैमान घातलं आहे. महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनीही कोरोना टेस्ट करून घेतली आहे. सुदैवाने अमित देशमुख यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. खोकला आणि ताप आल्यामुळे डॉक्टरांनी कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला दिला होता, यानंतर मी मुंबईच्या जेजे रुग्णालयात कोरोना टेस्ट करुन घेतल्याचं अमित देशमुख यांनी सांगितलं आहे.
प्रकृती ठीक आहे, तसंच काळजी करण्याचं कारण नाही. आणखी ४ दिवस घरातून काम करणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर कार्यालयातून काम पाहू, असं अमित देशमुख म्हणाले आहेत.