breaking-newsराजकारणराष्ट्रिय

#CoroanaVirus: धक्कादायक! सुरक्षेचे उपाय आणि मास्क नसल्याची तक्रार करणाऱ्या डॉक्टरवरच निलंबनाची कारवाई

सुरक्षेचे उपाय आणि मास्क नसल्याची तक्रार करणाऱ्या डॉक्टरलाच निलंबित करण्यात आल्याचा प्रकार आंध्र प्रदेशात घडला आहे. काही दिवसांपूर्वी डॉक्टरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ आंध्र प्रदेशातील विरोधी पक्षातील नेत्याने शेअर केला होता. या व्हिडीओत डॉक्टर सुधाकर राव सुरक्षेचे उपाय आणि मास्क नसल्याची तक्रार करताना पोलिसांच्या गैरवर्तवणुकीबद्दलही बोलत होते. रुग्णालयातील जिल्हा समन्वयक गरजेच्या वेळी उपस्थित नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. तसंच परिस्थिती गंभीर असताना एकाही मंत्र्याने औषधांचा मुबलक साठा आहे की नाही याची पाहण्याची करण्याती तसदी घेतली नसल्याचंही ते म्हणाले होते..

या व्हिडीओत डॉक्टर सुधाकर राव यांनी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याकडे मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. पण सरकारने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. निलंबनाच्या कारवाईमुळे मोठा वाद निर्माण झाला असून सरकारवर टीका होत आहे. तेलुगू देसम पार्टीचे (टीडीपी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीदेखील सरकारवर टीकास्र सोडलं आहे.

चंद्राबाबू नायडू यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “डॉक्टर सुधाकर यांनी सरकारी रुग्णालयात मास्क आणि ग्लोव्ह नसल्याचं उघड केलं होतं. ही तर सरकारची जबाबदारी आहे. या गंभीर मुद्द्याकडे लक्ष न देता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. एन ९५ मास्क मागणे हा एकमेव त्यांचा गुन्हा होता. हे धक्कादायक आहे”.

चंद्राबाबू नायडू यांनी एका ज्युनिअर डॉक्टरचाही सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. जर आरोग्य कर्मचाऱ्यांना अशी वागणूक मिळत असेल तर त्यांचं करोनाशी लढताना मनोधैर्य कसं वाढेल अशी विचारणा त्यांनी केली आहे. हे निलंबन तत्काळ रद्द करावं अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाने डॉक्टर सुधाकर राव टीडीपी पक्षाशी संबंधित असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी केलेले सर्व आरोप खोटे असून हे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button