breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मनोज जरांगेंच्या किडन्यावरून गोंधळ; वाचा नेमका घोळ काय?

मुंबई : राज्य सरकारने मराठा समुदायाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागं घेतलं आहे. यानंतर ते छत्रपती संभाजीनगर येथील रूग्णालयात उपचार घेत होते. पण आता मनोज जरांगे पाटील एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. याबाबतचा एक किस्सा त्यांनी स्वत: सांगितला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आता माझी प्रकृती एकदम चांगली आहे. डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या केल्या असून मी एकदम तंदुरुस्त झालो आहे. आता मी पुन्हा मराठ्यांना न्याय द्यायला चाललो आहे.

हेही वाचा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील मानाच्या गणपतींसह इतर गणेश मंडळांना भेट 

मला कशाचं काय झालंय? तिथे कुणीतरी डॉक्टर आला, त्याने मला तपासलं आणि म्हणाला तुम्हाला एकच किडनी आहे. पण मला एकच किडनी असती तर मग मी ३५ उपोषणं कशी केली असती. मग दुसरे डॉक्टर आले, मी त्यांना म्हटलं आधी माझ्या किडन्या तपासा मग बाकीचं बघू… त्यानंतर मला दोन किडन्या असल्याचं निष्पन्न झालं. मला आता त्या डॉक्टरचा चेहरा आठवत नाहीये. त्याने गोंधळात मला एकच किडनी असल्याचं सांगितलं होतं. आता तो डॉक्टरच होता का? हाच मला मोठा प्रश्न पडला आहे. पण माझं सर्व शरीर तपासून झालं आहे. मी आता एकदम तंदुरुस्त आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button