Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

5 लाख मुलींना कॉलेज आणि होस्टेल फी माफ; ‘कमवा आणि शिका’तून दरमहा 2 हजार

College and hostel fees waived : महिला सबलीकरणासाठी केवळ महिलांनीच नव्हे तर संपूर्ण समाजाने एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. सांगली जिल्ह्यात महिला सबलीकरणासाठी एक अभिनव प्रयोग राबवण्यात आला असून 50 शाळांमधील सुमारे 36 हजार मुलींना दर शनिवारी एक तास कराटे आणि ज्युडोचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणातून पहिला येलो बेल्ट मिळवलेल्या 15 हजार 400 मुलींना आज प्रमाणपत्र देण्यात आले असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

रविवारी सांगली येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढील बेल्ट मिळवण्यासाठी लागणारे शुल्क प्रशासनाकडून दिले जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. याशिवाय, जून महिन्यापासून जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वसंरक्षणाच्या दृष्टीने लाठीकाठी प्रशिक्षण सुरू करण्याची घोषणा देखील त्यांनी केली. यावेळी राज्यातील मुलींच्या शिक्षणासाठी देखील महत्वाची घोषणा करण्यात आली. राज्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे 5 लाख मुलींना कॉलेज फी आणि हॉस्टेल फी माफ करण्यात येणार असून त्याचबरोबर कमवा आणि शिका योजनेअंतर्गत दरमहा 2 हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

हेही वाचा –  KYC नसेल तर गॅस नाही! सिलिंडर वितरणाचे नियम कडक, दोन सिलिंडरमधील अंतर आता 30 दिवस

सांगलीतील कन्या सबलीकरण उपक्रमाअंतर्गत आयोजित या कार्यक्रमात करते प्रशिक्षण घेतलेल्या मुलींना येलो बेल्ट आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नाईकवाडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह अनेक अधिकारी आणि कराटे प्रशिक्षण घेतलेल्या मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

दरम्यान महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार विशाल पाटील यांनी देखील मुलींच्या स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे कौतुक केले. या उपक्रमांतर्गत मुलींचे सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण पाहून मला माझ्या मुलींची आठवण झाली. मला देखील दोन मुली आहेत. या मुलींचे करते प्रशिक्षण पाहून माझे म्हातारपण सुखरूप जाईल असा विश्वास वाटतो, असे ते म्हणताच कार्यक्रमात उपस्थितांमध्ये हशा पिकला.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमात सुमारे एक हजार मुलींना येलो बेल्ट ग्रेडचे प्रमाणपत्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. मुलींच्या स्वसंरक्षण आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button