पिंपळेनिलख येथे वसुंधरा दिवसानिमित्त स्वच्छता, जनजागृती मोहीम, वृक्षसंवर्धन
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपळवन निसर्गसंवर्धन संस्था विशालनगर पिंपळे निलख येथे जागतिक वसुंधरा दिवस परिसराची स्वच्छता करून साजरा करण्यात आला. यामध्ये वृक्ष संवर्धन जनजागृती मोहीम देखील राबवण्यात आली.
जागतिक वसुंधरा दिवसानिमित्त माजी नगरसेवक आरती चोंधे तसेच हिंद मित्र मंडळ सेवा ट्रस्ट , इंडियन सायकल क्लब, राष्ट्रीय स्वयं संघ ,ई सी ए पर्यावरण संवर्धन ग्रुप, पिंपरी चिंचवड आरोग्य विभाग यांच्या पुढाकारातून विशालनगर परिसरात “पिंपळवन रस्त्यालगतच्या 126 झाडा लगतच्या सर्व कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली विशेषता प्लास्टिक, थर्माकोल व प्लास्टिक असा कचरा गोळा करण्यात आला. यामुळे पिंपळवन रस्त्याने मोकळा व स्वच्छ श्वास घेतला.
या उपक्रमासाठी शिरीष साठे, नितीन इंगवले, चंद्रकांत ववले, कविता टकले, सुचित्रा गराडे, विनिता दाते, विनोद बोडके, अजय पाटुकले,रमेश पाटील, मिनाक्षी घोरपडे,भाग्येश पाटुकले,नंदकुमार भोसले ,संतोष दरेकर, सुनील अडसूळ ,नितीन इंगवले, विकास साठे,जयेश बोडके, उपस्थित होते