TOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकः वाकड येथील शिवकॉलनीमध्ये अश्विनीताई जगताप यांची संवाद सभा उत्साहात
![Chinchwad Vidhan Sabha by-election: Ashwini and Jagtap's dialogue meeting in Shiv Colony, Wakad in excitement](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Ashwini-Jagtap-1-780x470.jpg)
चिंचवडः चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांच्या प्रचाराचा झंझावात सुरु आहे. बुधवारी (15 फेब्रुवारी) रोजी चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक प्रचारादरम्यान वाकड येथील शिवकॉलनीमध्ये नागरिकांशी भेट घेत संवाद साधला.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/image-28-1024x682.png)
त्याप्रसंगी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, मा.उपममहापौर झामाताई बारणे, नानी घुले, भाजपा जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात, मा.नगरसेवक निलेश बारणे, सामाजिक कार्यकर्त्या करिष्माताई बारणे, सुरेश राक्षे तसेच भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (ए), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी लाखोंच्या मताधिक्याने अश्विनीताई यांना विजय मिळवून देण्याचा संकल्प मतदारांनी केला.