TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमराठवाडामहाराष्ट्रमहिला दिनराजकारणराष्ट्रिय

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक ः सकाळी 7 ते 5 वाजेपर्यंत झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी- 41.06 %

चिंचवड मतदार संघामध्ये एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार

पिंपरीः चिंचवड विधानसभा मतदार संघात आज रविवार २६ फेब्रुवारी रोजी मतदान सुरु आहे. या मतदार संघामध्ये एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार असून ५१० मतदार केंद्रावर मतदान होत आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघात सकाळी 7 ते 5 वाजेपर्यंत झालेल्या एकूण मतदानाची 41.06 % नोंद झाली आहे. दरम्यान दुपारी ०३ वाजेपर्यंत ३३.५५ टक्के मतदान झाले होते.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वयोवृध्द मतदार तसेच दिव्यांगांसाठी मतदान केंद्रावर विशेष सहायकासह व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. ते देखील मताधिकार बजावत आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील 255 मतदान केंद्रावर वेबकास्टींगच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन मधील नियंत्रण कक्षातून संपूर्ण मतदान प्रक्रीयेवर लक्ष ठेवले जात आहे. या कक्षाला निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच काही मतदान केंद्रांना देखील ते भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करीत आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीत मोठ्या प्रमाणात लक्ष्मीचे दर्शन, सात वाजेपर्यंत 50 टक्के मतदानाची शक्यता…
स्व. लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे होत असलेल्या चिंचवड पोटनिवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर झाल्याने निवडणुकीतील चुरस वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत दुरंगी लढत होणार असे बोलले जात होते. मात्र अपक्ष उमेदवाराने प्रचारात जोराची लढत दिल्याने तिरंगी सामना दिसून आला. मतदार संघात गेल्या तिन दिवसांपासून तिन्ही उमेदवारांच्या नावाने पैशाचे वाटप मोठ्या प्रमाणात झाले आहे. सुरूवातीला प्रत्येक मतदाराला दोन हजार रुपये भाव फुटलेला तो पाच हजारांपर्यंत गेलेला दिसला. या वाटपात केवळ झोपडपट्टीतील मतदाराबरोबर मोठमोठ्या एक ते दीड कोटींच्या फ्लॅटमध्ये राहणारे उच्चभ्रू यांनाही लक्ष्मीचे दर्शन झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मतदार संघातील रहाटणी, काळेवाडी, संतोष नगर, थेरगाव, पिंपळे गुरव, वाकड या परिसरात प्रथम मतदारांना लक्ष्मीने दर्शन दिले. व त्यानंतर कमी जास्त प्रमाणात मतदार संघातील अनेक ठिकाणी लक्ष्मीदर्शन झाल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. चिंचवड विधानसभा पोटनिवणुकीत किमान 50 टक्के मतदान होईल, असा अंदाज राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button