breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : आम आदमी पार्टीतर्फे मनोहर पाटील रिंगणात!
![Chinchwad Assembly by-election: Manohar Patil in the arena for Aam Aadmi Party!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/mnoharpatil-aap-780x470.jpg)
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील अत्यंत चुरशीची ठरलेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीतर्फे मनोहर पाटील यांना उमेदवारी घोषीत करण्यात आली आहे.
याबाबत आपचे पिंपरी-चिंचवडचे कार्यकारी प्रमुख चेतन बेंद्रे यांनी माहिती दिली. चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड तर्फे “श्री मनोहर पाटील” हे आपले अधिकृत उमेदवार असणार आहे. तरी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी “ग क्षेत्रीय कार्यालय, थेरगाव” येथे लवकरात लवकर जमावे आपल्याला मनोहर पाटील यांचा उमेदवारी उमेदवारी अर्ज भरायचा आहे, असे आवाहन बेंद्रे यांनी केले आहे.