breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुख्यमंत्री केसीआर यांचा पंढरपूरला येताना मटनाचा शाही बेत! मिटकरींचा गंभीर आरोप

मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर. केसीआर तेलंगणाचे सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि इतर नेत्यांसह पंढरपूला येणार आहेत. या दौऱ्याच्यानिमित्ताने केसीआर यांच्याकडून मोठं शक्तिप्रदर्शन केले जात आहे. वाटेत त्यांनी उमरगा येथे भोजन घेऊन सायंकाळी सहा वाजता सोलापूरमध्ये दाखल होणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केसीआर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

अमोल मिटकरी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, मटनाचा शाही बेत! पंढरी वारिवर असताना मुख्यमंत्री केसीआर हा प्रकार शोभतो का? वारकऱ्यांच्या भावनाशी खेळू नका? पंढरपूर येताना १० हजार वेळा विचार करा. पंढरीची वारी पवित्र आहे आपल्या अश्या वागण्याने अपवित्र करू नका.

हेही वाचा – ‘ट्रॅक कंपोनन्ट्स’च्या कामगारांना तब्बल साडेबारा हजारांची वेतनवाढ!

https://twitter.com/amolmitkari22/status/1673232997091364864

माध्यमांनी संवाद साधला असता ते म्हणाले की, केसीआर पंढरपूरला येत आहेत. वाटेत ते तेलंगणाहून पंढरपूरला येताना धाराशिवमधील उमरगा येथे थांबतील. तिथे हा मटणाचा बेत आखण्यात आला आहे. तिथे मटणाची पार्टी करून ते रात्री सोलापूरला मुक्कामी असतील. मुळात कोणी काय खावं, काय प्यावं यावर आमचं काही मत नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु ते सोलापूर मुक्कामी असताना, एकीकडे अबकी बार किसान सरकार हे होर्डिंग त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावले आहेत. वेलकम टू महाराष्ट्र असे होर्डिंग्स लावले आहेत. या होर्डिंग्सवर पांडुरंगाची लावलेली प्रतिमा पाहून वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत.

त्यांनी अवश्य मटणाचा बेत करावा, दारुचा बेत करावा, त्यावर आमचं काहीच मत नाही. आपले वारकरी दारू आणि मटणाला निषिद्ध मानतात. या महाराष्ट्राला वारीची मोठी परंपरा आहे. त्यामुळे त्यांनी वारकऱ्यांच्या भावनांशी कृपा करून खेळू नये. जर असं काही केलं तर उद्या तरी त्यांनी पथ्य पाळावं. उद्या त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना येताना आणि जाताना मटणाचा बेत करण्यापासून दूर ठेवावं. आमच्या वारकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात. अन्यथा वारकरी ही गोष्ट लक्षात ठेवतील, असंही मिटकरी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button