breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘असे भोंगेधारी, पुंगीधारी खूप पाहिलेत’, मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका

मुंबई |

मशिदीवरील भोंग्यांवरुन राज्यातील राजकारणात खळबळ माजवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज 1 मे रोजी औरंबादेत मोठी सभा आहे. मात्र, त्यांच्या या सभेवरुन सत्ताधाऱ्यांनी त्यांना धारेवर धरण्यास सुरुवात केलीये. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यानंतर आता स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर टीका केलीये. ‘असे खेळ खूप पाहिलेत, असे खेळ करणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही’, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना टोला हाणला.

लोकसत्तेने घेतलेल्या खास मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर खरमरीत अशी टीका केली. हिंदुत्वाच्या मुद्यावरुन मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर घणाघात केला. अशा खेळाडुंकडे मी लक्ष देत नाही, हे खेळाडू नेमक्या कोणत्या-कोणत्या मैदानैत कोणते-कोणते खेळ करतात हे आतापर्यंत लोकांनी अनुभवलं आहे. कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ, असे खेळ महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहेत.

  • करमणूक फुकटात मिळत असले तर का नाही पाहायची – मुख्यमंत्री
  •  

दोन वर्षांचा कालखंड फार मोठा होता. यादरम्यान सर्व बंद होतं. मग करमणूक फुकटात मिळत असले तर का नाही पाहायची असंही ते म्हणाले. शिवसेनेला ओळख करुन देण्याची गरज नाही. शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष, मला ते लपवायची गरज नाही आणि मी ते करणारही नाही. सध्या मार्केटिंगचा जमाना आहे, नाही पसंत पडलं तर परत करा, तसं हे तुमचं फळलं तर फळलं नाहीतर परत, असे भोंगेधारी, पुंगीधारी खूप पाहिलेत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली.

भोंग्यांचा विषय गाजलेला वाटत नाही. माला माझ्या जनतेच्या जिवाची पर्वा आहे. केंद्राने भोंग्याबाबत धोरण ठरवावं. राज ठाकरेंचा अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न आहे. हिंदूत्वाचा डंका आम्हाला वाजवावा लागत नाही. शिवसेनेने कधीचं झेंडा बदलला नाही, असंही ते म्हणाले. आता मुख्यमंत्र्यांच्या या टीकेवर राज ठाकरे औरंगाबादच्या सभेत काय उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button