‘शिंदे गटाप्रमाणे आम्हालाही तितक्याच जागा मिळव्यात’; अजित पवार गटाची मागणी
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महायुती सरकारकडून जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे. दरम्यान, शिंदे गट आणि अजित पवार गट ठराविक जागांसाठी अडून बसल्याचं चित्र आहे. समसमान जागा वाटप व्हावं अशी मागणी अजित पवारांनी केली होती. यावरून, मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे.
छगन भुजबळ म्हणाले, अजित पवार हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे जागा-वाटपात त्यांनी त्यांचं मत मांडलं आहे. जवळपास शिंदे गटाचे जितके आमदार आले आहेत, तेवढेच अजित पवार गटाचे आमदार आलेले आहेत. त्यामुळे सारासर विचार करता त्यांच्याप्रमाणेच आम्हालाही न्याय मिळायला पाहिजे, असं मत मांडलं तर ते चुकीचं नाही.
हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकार देणार ड्रोनसाठी सबसिडी
दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्यात वाटपासंदर्भात अमित शहा यांच्यासोबत चर्चा होईल. याच महिन्यात बैठक अपेक्षित होती, मात्र विविध राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार, लोकसभेचे अधिवेशन, महाराष्ट्रातलं विधानसभेचे अधिवेशन यामुळे बैठक लांबली. जानेवारी महिन्यात आमची महाराष्ट्रातल्या घटक पक्षांची बैठक होईल आणि त्यानंतर भाजप श्रेष्ठींसोबत एकनाथ शिंदे आणि आमच्या पक्षाचे नेते मिळून बैठक करतील असं खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.