‘ब्राह्मणांमध्ये संभाजी, शिवाजी नावं नाहीत’; छगन भुजबळ यांचे मोठं विधान
![Chhagan Bhujbal said that there are no names like Sambhaji or Shivaji among Brahmins](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Chhagan-Bhujbal-780x470.jpg)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावे नसतात, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
छगन भुजबळ म्हणाले, आपल्याला शिक्षण दिलं. शिक्षणाची द्वारे ज्यांनी खुले केली ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराज यांनी. त्याचं कायद्यात रुपांतर केलं ते बाबासाहेब आंबेडकर यांनी. भाऊराव पाटील आदी महापुरुषांनी आपल्याला शिक्षणाची दारे उघडून दिली. बाकीच्यांना सरस्वती आवडते, काहींना शारदा आवडते. आम्ही काय पाहिलं नाही. आम्हाला काही त्यांनी शिक्षण दिलं नाही. आम्हाला शिक्षण दिलं ते या महापुरुषांनी दिलं. त्यामुळे ते आमचे देव आहेत. ते तुमचेही देव असले पाहिजेत. मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत.
हेही वाचा – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या स्वयंरोजगार विभाग राज्य प्रमुख पदी मेघा पवार नियुक्ती
मी ब्राह्मणांवर टीका करत नाही… ब्राह्मण वर्ग सोडल्यास तुम्ही आम्ही शुद्र. त्यानंतर मग अतिशुद्र. शिक्षणाचा अधिकार ब्राह्मण वर्गातील फक्त पुरुषांना. महिलांनाही नाही. केवळ दीड टक्के लोकांपुरतंच शिक्षण मर्यादित होतं. ब्राह्मण समाजाने वाईट वाटू नये. ब्राह्मण समाजात संभाजी शिवाजी असे नाव ठेवत नाही. भिडे म्हणतो, माझ्या बागेतील अंबे खा, मुले होतील. मग मेडिकल कॉलेज कशाला? बाबासाहेबानी सांगितले शिक्षण घ्या, असं छगन भुजबळ म्हणाले.
आपले देव कोण? ज्यांनी आपल्याला मोठे केले. आपल्यसााठी कष्ट केले ते. सावित्री बाई फुले यांनी मुलींची शाळा सुरू केली. आजच्या पुरस्कारात २ ते ३ मुले होती. मुली जास्त होत्या. ही सावित्रीबाई फुले यांची देण आहे. त्यांनी मुलींना शिक्षणाचा मार्ग दाखवला म्हणून मुली शिकल्या. त्यामुळे शिक्षण हे महत्त्वाचं आहे. समाजातील प्रत्येक वर्गाने ते घेतलं पाहिजे, असंही छगन भुजबळ म्हणाले.