चंद्रशेखर बावनकुळेंनी ‘त्या’ फोटोवर दिली प्रतिक्रिया; म्हणाले..
![Chandrashekhar Bawankule reacted to that photo](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Chandrashekhar-Bawankule-780x470.jpg)
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चद्रशेखर बावनकुळे यांचा कॅसिनोतील एक फोटो शेअर केला. यावरून राज्यातील राजकारण चांगलच तापलं. दरम्यान, यावरून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मागच्या ३४ वर्षांपासून राजकीय, सामाजिक जीवनात आहे. भाजपा-शिवसेना युतीत अनेक वर्षे काम केले. शिवसेनेतील अनेक नेते मला ओळखतात. विधिमंडळात अनेक मित्र मंडळी आहेत. चारवेळा आम्ही निवडून आलो आहोत. अशा फोटोंच्या आधारावर कोणाची इमेज खराब करता येत नाही, असं मला वाटतं. ३४ वर्षे काम करून आम्ही इमेज तयार केली आहे. त्यामुळे हा प्रयत्न केला असेल तर त्यांचा प्रयत्न त्यांना लखलाभ.
हेही वाचा – Salman Khan : सलमान खानचा भरगर्दीत एका महिलेला किस; व्हिडीओ व्हायरल
पण यामुळे माझ्या परिवाराला त्रास झाला. माझ्या मुलीने आणि सुनेने माझ्याकडून तीन दिवसांचा वेळ घेऊन नियोजन केलं होतं. हाँकाँग या पर्यटनस्थळी गेलो. सगळं चांगंल चालू असताना व्यक्तिगत जीवनात आमच्या परिवाराला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न झाला. राजकारणात काम करताना असे प्रयत्न चुकीचे वाटतात. त्यामुळे मला आणि परिवाराला वाईट वाटलं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
सगळ्यांनाच माहितेय की कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर कॅसिनो क्रॉस करावं लागतं. मकाऊ किंवा हाँककाँगला गेल्यानंतर कॅसिनो क्रॉस करूनच सगळीकडे जावं लागतं. कोणीतरी असे प्रयत्न करायचे आणि ३५० कोटींचा आरोप केला. एक रुपयाही तुमच्या बॅगेत असला तर तीन तीन वेळा चेकिंग करावी लागते, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.