खांदेश मराठा मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा
पिंपरी : निगडी येथील खान्देश मराठा मंडळ आयोजित शिवजयंती सोहळा दिनांक १९ फेब्रुवारी रोजी मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला.खान्देश मराठा मंडळाचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर पगार यांनी शिवविचारांचे पालन केल्यास सामाजिक सलोखा अबाधित राहण्यास मदत होवून राष्ट्राची प्रगती होईल असा विचार मांडला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून लेखक समीक्षक सुभाषचंद्र सोनार यांनी विचार मांडले. छत्रपती शिवराय रयतेचे राजे होते त्यांचा वास्तव आणि खरा इतिहास अभ्यासला पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव प्रदीप शिंदे यांनी केले. उपाध्यक्ष गुलाबराव पाटील, उपाध्यक्ष एस. आर. पाटील, भास्कर पाटील, संचालक कृष्णराव चैत्राम अहिरराव, मिलिंद पाटील, संजय पाटील, अनिल सावंत, सुरेश पाटील आणि मार्गदर्शक कमिटीतील मार्गदर्शक बी. के. पाटील, माधव पवार, बी. डी. पाटील, उपस्थित होते.
कार्यक्रमात राजमाता जिजाऊ फॅन्सी ड्रेस मध्ये नूतन पाटील यांनी पेहराव केला होता. कु. दर्शना, लावण्या, कृतिका, समृद्धी आणि चि.भावेश माळी यांनी शिवाजन्माचा पाळणा आणि शिवागितांवर आधारित नृत्य सादर केले. मनीषा पाटील आणि नूतन पाटील यांनी नृत्यगायना चे दिग्दर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पाटील यांनी केले. मिलिंद पाटील यांनी आभार व्यक्त केले.आलेल्या सर्व शिव भक्तांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.कार्यक्रम संपल्यावर मंडळातर्फे अल्पोहाराचा आस्वाद घेतला. आणि कार्यक्रमाची सांगता झाली