महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार : शपथ घेतलेल्या मंत्र्याची यादी वाचा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती
![Cabinet expansion of the Grand Alliance government: Read the list of ministers sworn in!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/Cabinet-expansion-of-the-Grand-Alliance-government-Read-the-list-of-ministers-sworn-in-780x470.jpg)
नागपूर: महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी शपथविधी सोहळा पार पडला आहे. याआधी 5 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती. मुंबईत मोठा सोहळा पार पडला होता. पण त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. महायुतीत खातेवाटपावरुन एकमत होत नसल्याने विस्तार रखडल्याचं बोललं जात होतं. पण अखेर आज शपथविधी सोहळा पार पडला आहे.
भाजपचे मंत्रिमंडळातील नवे मंत्री
कॅबिनेट मंत्री :
चंद्रशेखर बावनकुळे
राधाकृष्ण विखे पाटील
चंद्रकांत पाटील
गिरीश महाजन
अतुल सावे
गणेश नाईक
मंगलप्रभात लोढा
शिवेंद्रराजे भोसले
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
आशिष शेलार
अशोक उईके
जयकुमार गोरे
संजय सावकारे
नितेश राणे
राज्यमंत्री
माधुरी मिसाळ
मेघना बोर्डीकर
पंकज भोईर
शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्रिमंडळातील नवे मंत्री
कॅबिनेट मंत्री :
शंभुराज देसाई
उदय सामंत
दादा भुसे
गुलाबराव पाटील
संजय राठोड
संजय शिरसाट
प्रताप सरनाईक
भरत गोगावले
प्रकाश आबिटकर
राज्यमंत्री :
आशिष जयस्वाल
योगेश कदम
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मंत्रिमंडळातील नवे मंत्री
कॅबिनेट मंत्री :
हसन मुश्रीफ
आदिती तटकरे
बाबासाहेब पाटील
दत्तात्रय भरणे
नरहरी झिरवळ
माणिकराव कोकाटे
मकरंद जाधव-पाटील
राज्यमंत्री :
इंद्रनील नाईक
कसा आहे विधानसभा निवडणूक निकाल?
विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त यश मिळालं आहे. महायुतीची अक्षरश: त्सुनामी आली आणि 234 जागा जिंकल्या. एकट्या भाजपाने 132 जागा जिंकल्या असून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकल्या. महाविकास आघाडीला मात्र फक्त 50 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. मविआत सर्वाधिक जागा लढवलेल्या काँग्रेसनं केवळ 16 जागांवर विजय मिळवता आला. तर शिवसेनेला 20 जागा मिळाल्या. मनसेला तर एकही जागा जिंकता आली नाही.