breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मराठा समाजाला १० टक्के आरक्षण कायद्याच्या मसुद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी!

मुंबई | मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज सरकारने विशेष अधिवेशन बोलवलं आहे. या अधिवेशनात मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मिळणार हे निश्चित झालं आहे. कारण सरकारने जो मसुदा आणला आहे त्यात १० टक्के आरक्षणाची तरतूद आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० आरक्षण मिळणार असल्याची माहिती ANI ने दिली आहे.

मराठा समाज हा राज्यभरात २७ टक्के असल्याचे न्या शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आढळून आले. सुमारे ५२ टक्के आरक्षण असणाऱ्या मोठ्या संख्येतील जाती व गट आधीच राखीव प्रवर्गात आहे. त्यामुळे राज्यातील २७ टक्के असलेल्या अशा मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात ठेवणे पूर्णपणे असामान्य ठरेल अशी माहिती आयोगाने अहवालात दिली आहे.

हेही वाचा     –      मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन, मनोज जरांगेंच्या नेमक्या मागण्या काय?

मराठा आरक्षणाबाबत मसुदा समोर आला आहे. या मुसद्यात भारताच्या संविधानानुसार खंड एकच्या अल्पसंख्यांक व्यक्तिरिक्त इतर शैक्षणिक संस्था तसेच खासगी शैक्षणिक संस्थामध्ये एकूण जागांच्या १० टक्के आणि राज्याच्या पदासंदर्भात तसेच सरळसेवा भरतीच्या एकूण नियुक्त्याच्या १० टक्के आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी स्वतंत्र पणे राखून ठेवण्यात येईल. परंतु भारताच्या संविधानाच्या पाचव्या अनुसुची अन्वय याबाबतीत राज्यपालांनी वेळोवेळी काढलेल्या अधिसुचनेनुसार राज्याच्या अनुसुचीत क्षेत्रांमध्ये अनुसुचीत जमातींच्या करिता वरील आरक्षण लागू होणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button