breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

CAB: कर्नाटकातील गोळीबाराची चौकशी

कर्नाटक | महाईन्यूज

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनावेळी मंगळुरू येथे पोलिस गोळीबारात दोन जण ठार झाल्याची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस.येडीयुरप्पा यांनी दिलेले आहे. त्यांनी गुरुवारच्या हिंसाचारानंतर आज तेथे भेट दिली, त्या वेळी संचारबंदी शिथिल करण्याचे आदेशही जारी केलेले आहे. जे लोक मारले गेले त्यांच्या कुटुंबीयांना भरपाई जाहीर करण्यास जिल्हा प्रशासनास सांगितले आहे, असे स्पष्ट करून ते म्हणाले, की संचारबंदी मागे घ्यावी अशी सर्वाचीच इच्छा दिसून आलेली आहे. त्यामुळे अधिकारी व गृहमंत्री यांच्याशी चर्चा करून ती दुपारी ३ ते सायंकाळी सहा या काळात शिथिल करण्यात आली आहे. पण रात्रीची संचारबंदी लागू राहील, उद्या संपूर्ण दिवसभर संचारबंदी शिथिल करण्यात येईल. पण रात्री पुन्हा संचारबंदी राहील व सोमवारी संचारबंदी पूर्ण मागे घेतली जाईल. पण प्रतिबंधात्मक आदेश लागू राहीलच.

प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना मंगळुरूत गुरुवारी निदर्शनांवेळी हिंसाचार झालेला होता. त्यानंतर काही भागात संचारबंदी शुक्रवारी रात्री लागू करण्यात आलेली आहे. त्यानंतर ती मंगळुरू आयुक्तालयाच्या सर्व क्षेत्रात २२ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू करण्यात आली. जे दोन जण मारले गेले त्यांच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी शनिवारी भेट घेतली आहे. ख्रिश्चन व मुस्लीम समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा केलेली आहे. मंगळुरूतील घटनांची चौकशी कशा प्रकारे करायची याचा निर्णय गृहमंत्र्यांशी चर्चा करून घेतला जाईल, असे सांगून ते म्हणाले, की त्या दिवशी एका इमारतीभोवती गर्दी जमली होती, त्या इमारतीत अग्निशस्त्रे होती व त्यातूनच तिथे हिंसाचार झाल्याने पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. केरळातून आलेल्या पत्रकारांना अटक केल्याबाबत त्यांनी सांगितले, की ते का आले होते व त्यांनी कुठल्या कृती केल्या यासह सर्व गोष्टींची चौकशी केली जाईल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button