breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

‘आरोप सिद्ध झाला तर स्वत: फाशीवर जाईन’; ब्रिजभूषण सिंह वक्तव्य

दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून कुस्तीपटूचं आंदोलन सुरू आहे. देशासाठी पटकावलेली पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय कुस्तीपटूंनी घेतला होता. मात्र, शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी खेळाडूंची समजून काढून त्यांचे मन वळविले. दरम्यान, यावरून भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, हे कुस्तीपटू त्यांची मेडल्स गंगा नदीत सोडायला गेले होते. पण त्यांनी मेडल्स गंगा नदीत सोडले नाहीत. तर त्या ऐवजी त्यांनी ही मेडल्स नरेश टिकैत यांनी दिली. तो त्यांचा आधार आणि त्यांची भूमिका आहे. याला मी करू शकतो. माझ्यावर केलेल्या आरोपांपैकी एकही आरोप सिद्ध झाला तर मी स्वत: हून फाशी घेईल.

हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा! अहमदनगरचं नामांतर अहिल्यादेवी होळकर नगर होणार

जेव्हापासून माझ्यावर आरोप होत आहेत. मी विचारतोय की हे सगळं कधी झालं, कुठं झालं. आम्ही आयोध्यामध्ये राहतो. इथे प्राण जातो मात्र वचन जात नाही. चार महिने झाले आरोप लावून. मी म्हणतोय की माझ्यावरील आरोप सिद्ध झाले तर मी फासावर लटकेन. मी यावर आजही कायम आहे, असं ब्रिजभूण सिंह म्हणाले.

मी या खेळाडूंशी आजही वैर ठेवक नाही. ही माझीच मुलं आहेत. यांच्या यशात माझा देखील वाटा आहे. १० दिवसांपूर्वी हे मला त्यांच्या यशाचा परमेश्वर म्हणत होते. माझ्या कार्यकाळात जो संघ १८ व्या स्थानावर होता तो ५ व्या स्थानावर आला आहे. ऑलिम्पिकमध्ये ७ मेडल धील ५ कुस्तीतील मेडल माझ्या कार्यकाळात आली आहेत. आता मला काहीतरी मोठं करायचं आहे. या वर्षी ५ तारखेला संतांचा कार्यक्रम आहे. पाप करणाराच पापी नसतो तर जो मौन बाळगतो त्यात भागीदार असतो, असंही ब्रिजभूषण म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button