पोलिसांची परवानगी नसतानाही मोर्चा काढल्याने विनायक मेटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
बीड – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला पोलिसांची परवानगी नव्हती. त्यामुळे पोलिसांनी विनायक मेटे आणि नरेंद्र पाटील यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दोघांसह तब्बल अडीच ते तीन हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अशोक चव्हाण यांच्यासारखा नाकर्ता माणूस आजपर्यंत झालेला नाही. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा बापट आयोगाच्या शिफारशी फेटाळण्याची मागणी आम्ही केली होती. पण त्याकडे अशोक चव्हाण यांनी दुर्लक्ष केलं. 2014 ला सुद्धा जे आरक्षण दिलं ते ही चुकीचं दिलं, त्याची फळं आज आपण भोगतोय. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आरक्षण अतिशय चांगलं होतं. पण या माणसाच्या मुर्खपणामुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या दुर्लक्षामुळे घालवलं, असा घणाघाती आरोपही मेटे यांनी यावेळी केलाय. इतकच नाही तर मराठा आरक्षण, मराठा समाजाला सवलती आणि अशोक चव्हाण यांचा राजीनामा घ्या. त्यासाठी 5 जुलैपर्यंतची वेळ देतो. नाहीतर 7 जुलैला होणारं पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशारा मेटे यांनी दिला होता.





