ब्रिक्स स्कूल ऑफ आर्किटेक्ट व व्हीआयटी पीव्हीपी संघांची विजयी सलामी
![BRICS School of Architects and VIT PVP Teams' Victory Salute](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Sports-780x470.jpg)
- आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा : एसबी पाटील, अल्लाना संघांना पराभवाचा धक्का
पुणे : ब्रिक्स स्कूल ऑफ आर्किटेक्ट व व्हीआयटी पीव्हीपी संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाना पराभूत करताना अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली. चार दिवसीय स्पर्धेचे आयोजन आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन एमसीई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्षा अबेदा इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले.
आज झालेल्या सलामीच्या लढतीमध्ये ब्रिक्स स्कूल ऑफ आर्किटेक्ट संघाने आकुर्डीच्या एस बी पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाला ६ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना ब्रिक्स स्कूल ऑफ आर्किटेक संघाने निर्धारित ७ षटकांत ७ बाद ५१ धावा केल्या. ब्रिक्स स्कूल संघाच्या कैवल्य बर्डेने दमदार फलंदाजी करताना १९ (१५ चेंडू, ४ चौकार), तेजस फडकेने १३ (११ चेंडू, १ चौकार) धावा केल्या. एसबी पाटील संघाकडून आयुष खांडगेने ३ तर प्रणव गायकवाड व यश बच्चे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. एसबी पाटील संघाला हे आव्हान पेलवले नाही. एसबी पाटील संघाने निर्धारित ७ षटकांत ६ बाद ४५ धावाच करता आल्या. एसबी पाटील संघाकडून आदित्य दुर्गुडेने १७ धावा करताना लढत देण्याचा प्रयत्न केला. ब्रिक्स संघाकडून कैवल्य बर्डे व अमन कुरेशीने प्रत्येकी २ तर अमय राठीने १ गडी बाद केला.
दुसऱ्या लढतीमध्ये व्हीआयटी पीव्हीपी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाला ४३ धावांनी पराभूत केले. व्हीआयटी पीव्हीपी संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ६ षटकांत ४ बाद ७४ धावा केल्या. यात नमन पारेखने २२, मोहित जाधवने १९ तर हर्षित ग्रोव्हरने १० धावांचे योगदान दिले. यश देशमुखने ३ तर मुशारफ पटेल व फैझान खान यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाला निर्धारित ६ षटकांत २ बाद ३१ धावाच करता आल्या. यात फैझान खानने ८ तर बिलालने १० धावांची खेळी केली. सनी गुंजाळ व हर्षित ग्रोव्हरने यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.