Breaking News । पिंपरी-चिंचवडमधील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याबाबत ‘अफवा’
महाराजांच्या ‘मोजडी’ला पडल्याचा मॅसेज खोटा : विश्व हिंदू परिषदेचे कुणाल साठे यांनी केला निषेध
![Breaking News । 'Rumor' about Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pimpri-Chinchwad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Shekhar-Singh-780x470.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमध्ये मोशी येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम अद्याप सुरूच झालेले नाही. चौथरा बांधण्याचे काम सुरू आहे. याबाबत समाज माध्यमांमध्ये व्हायरल होणारा ‘मॅसेज’ दिशाभूल करणार आहे. यावर पिंपरी-चिंचवडकरांनी विश्वास ठेवू नये. महामानवांच्या नावाने शहरातील वातावरण कुलषित करण्याचा प्रकार यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांच उंच म्हणजे १०० फूटाचा पूर्णाकृती पुतळा साकारला जात आहे. राज्यातील मालवणच्या घटनेवरुन जी राजकीय वातावरण निर्मिती झाली आहे. त्यामध्ये आपला राजकीय स्वार्थ साधण्याच्या हेतुने भोसरीतील संभाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत नवा जावई शोध लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
वास्तविक, महाराजांच्या पुतळ्याचे काम सुरू झालेले नाही. पुतळ्याच्या धातुचे रॉ- मटेरियल दाखल झाले आहे. शंभर फुटाच्या पुतळ्याचे पार्ट आपल्या शहरात आले आहेत. पुतळ्याचे एसएसच्या ट्रक्चरमध्ये ३ कॉलम उभारले जाणार आहेत. त्यावर छोटे-छोटे पीस जोडले जाणार आहेत. संपूर्ण स्ट्रक्चर पूर्ण झाल्यानंतर पुतळ्याचे फिनिशिंग केले जाणार आहे. आरटीओच्या नियमावलीनुसार, ट्रान्स्पोटेशनसाठी पुतळ्याचे पीस तयार करावे लागले आहेत. कारण, वाहतुकीसाठी सोईचे होणार आहे. मोजडीला जो क्रॅक गेला आहे, असा मॅसेज फिरतो आहे. त्यामध्ये तथ्य नाही. कारण, त्याचे कामच फॅब्रिकेशन स्टेजमध्ये आहे. त्यामुळे अशी अफवा पसरवणे निंदनीय आहे.
काय आहे व्हायरल होणारा खोटा मॅसेज?
‘‘बोऱ्हाडेवाडी मोशी प्रदर्शन जागा येथे पिंपरी चिंचवड महापालिका सुमारे १०० कोटी रुपये खर्च करून छ्त्रपती संभाजी महाराज यांचा १०० फुटी उभा पुतळा करत असलेला पुतळ्यास पायातील (मोजडी) ला भेगा पडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. मालवण येथील पुतळ्यानंतर बोऱ्हाडेवाडी येथील हे पुतळा प्रकरण राज्यभर गाजणार असून छ्त्रपती संभाजी महाराज प्रेमी मध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.’’
धर्मवीर संभाजी महाराज यांचा स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण हा पुतळा उभारला जात आहे. मुळात ज्या पुतळ्याचे काम सुरूच झाले नाही. त्याची पूर्ण माहितीच न घेताच काही समाजकंटक ‘‘महाराजांच्या मोजडीला भेगा पडल्यात’’ असा मॅसेज सोशल मीडियामध्ये व्हायरल करुन शहरातील वातावरण कुलषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचा समस्त हिंदू समाज जाहीर निषेध करीत आहे.
– कुणाल साठे, विश्व हिंदू परिषद.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम अद्याप सुरूच झालेले नाही. सध्या पुतळ्याचे विविध पार्ट आले आहेत. त्याचे फिनिशिंग करण्यात येणार आहे. सदर पार्ट हे ‘फॅब्रिकेशन स्टेज’मध्ये आहेत. अद्याप पुतळ्याचे इन्स्टॉलेशनसुद्धा सुरू झालेले नाही. महाराजांचा १०० फूट उंच पुतळा उभारण्याबाबत राज्य सरकारच्या नगर सचिव विभागाची ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळणेबाबत आजच (दि.३० ऑगस्ट) पत्र पाठवले आहे. त्या ‘एनओसी’नंतरच मुख्य पुतळा उभारणीचे काम सुरू करण्यात येणार आहे. व्हायरल होणारा मॅसेज चुकीचा आहे.
– शेखर सिंह, आयुक्त, तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.