breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

संभाजी भिडेंची कार अडवत घोषणाबाजी, काळे झेंडेही दाखवले

Sambhaji Bhide | शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांची गाडी अडवत घोषणाबाजी झाली. तसंच त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. नाशिकमधल्या मनमाड या ठिकाणी ही घटना रात्री ११.३० च्या सुमारास घडली. आंबेडकरी विचारांच्या अनुयायांनी ही घोषणाबाजी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संभाजी भिडे हे येवला या ठिकाणाहून मालेगावला जात असताना ही घटना घडली.

संभाजी भिडे येवला या ठिकाणाहून मालेगावच्या दिशेने जात असताना त्यांची कार अडवण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर काही जणांनी काळे झेंडे दाखवले. तसेच संभाजी भिडे मुर्दाबाद अशा घोषणाही दिल्या. या प्रकरणात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि घोषणाबाजी करणाऱ्यांना आणि कारसमोर आलेल्या तरुणांना बाजूला सारले. त्यानंतर संभाजी भिडे यांची कार धुळ्याच्या दिशेने पुढे गेली.

हेही वाचा      –       मार्च महिन्यात ‘या’ दिवसापासून विवाह मुहूर्त बंद होणार, कारण काय?

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे येवला येथून मालेगावच्या दिशेने निघाले होते. मनमाड या ठिकाणाहून संभाजी भिडे मालेगावच्या दिशेने जाणार आहेत याची माहिती काहीजणांना मिळाली. पोलीस बंदोबस्तात भिडे यांची कार मनमाडमध्ये दाखल होताच काही जणांनी कारच्या समोर येत जोरदार घोषणाबाजी करत भिडे यांची कार अडवली. त्यामागून येणारी पोलिसांची कारही अडवली. या सगळ्यांच्या हातात संभाजी भिडेंचा निषेध करणारे बॅनर होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button