breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

भाजपाचे मिशन- २०२४: कार्यकर्त्यांना ताकद देणार अन्‌ ‘अब की बार १२५ पार’ करणार!

नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा विश्वास : वाल्हेकरवाडी-चिंचवड येथे दिमाखदार पदग्रहण सोहळा

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीचा विशाल वटवृक्ष तयार झाला आहे. शहराध्यक्षपदाच्या काळात पक्षाचा हा वटवृक्ष जोपासण्यासाठी आणि कायम सदाबहार फुलत ठेवण्यासाठी सचोटीने आणि प्रामाणिकपणे कार्यरत राहीन. लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्याप्रमाणेच कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे ‘‘अब की बार १२५ पार’’ या हेतूने काम करणार आहोत,  अशा भावना भाजपाचे नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केल्या आहेत. 

भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चार दिवसांपूर्वी तशी घोषणा केली. यानंतर चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डनमध्ये त्यांचा पदग्रहण सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. 

यावेळी आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, पूर्व महापौर उषा उर्फ माई ढोरे, पिंपरी-चिंचवड प्रभारी वर्षा डहाळे, प्रदेश निमंत्रित सदस्य सदाशीव खाडे, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते महेश कुलकर्णी, पूर्व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, भोसरी विधानसभा निवडणूक प्रमुख विकास डोळस यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले की,  शंकर जगताप यांच्या पाठीशी पूर्व शहराध्यक्ष तथा लोकनेते दिवंगत लक्ष्मण जगताप यांचा वारसा आहे. त्यांचा आदर्श त्यांनी डोळ्यांसमोर ठेवला आहे. या सोबतच त्यांच्याकडे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख आणि पूर्व नगरसेवक म्हणून अनुभव आहे. यापुढील काळात शंकर जगताप यांच्या पाठीशी त्यांचा भाऊ म्हणून, मित्र म्हणून, सहकारी म्हणून  खंबीरसाथीने उभा राहणार आहे. कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊन देणार नाही. जसे माझ्या पाठीमागे आपण सर्वजण उभे राहिलात,  त्याच ताकदीने आपण शंकर जगताप यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. 

राज्यसभेचे पूर्व खासदार अमर साबळे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीमध्ये दर ३ वर्षाने  अध्यक्ष हा बदलत असतो. पक्षाने निवड केलेल्या अध्यक्ष्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून पक्ष संघटना बळकटीकरण करावे हेच आपल्या पक्षाचे संस्कार आहेत. त्याचे आपण सर्वांनी पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव ढाके यांनी केले. सूत्रसंचालन राजू दुर्गे यांनी केले. काळूराम बारणे यांनी आभार मानले.

राज्यातील व शहरातील सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिलेली शहराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत असताना कदाचित मी सर्वगुणसंपन्न वाटत नसेल, तर वरिष्ठ नेत्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन करावे. कुठे चुकलो तर माझी कानउघाडणी करावी. मी मनात कोणताही द्वेष न ठेवता पक्षवाढीचे काम करत राहणार आहे. पक्षात काही मतभेद असले तरी मनभेद होऊ देणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा परिवारातील मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्याप्रमाणेच कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम करणार आहे. तसेच, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधून संघटन सक्षम करण्यासाठी कार्यरत राहणार आहे.
शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button