breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

“भाजपानं लोकशाही विकायला काढली, पण काँग्रेसनं तर…”, केरळच्या मुख्यमंत्र्यांचा दोन्ही पक्षांवर घणाघात!

केरळ |

केरळ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केरळमधील राजकीय वातावरण आता चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी LDF, काँग्रेसप्रणीत UDF आणि भाजपाप्रणीत NDA या तीन प्रमुख धुरंधरांमध्ये केरळ विधानसभेचा सामना रंगणार असून त्यासाठी तिन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. मेट्रे मॅन ई. श्रीधरन यांना भाजपानं मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यापासून या निवडणुकीत अधिकच रंगत भरली गेली आहे. या पार्श्वभूमीवर केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख विरोधी पक्षांवर तोंडसुख घेतलं आहे. “एकीकडे भाजपानं देशातली लोकशाही विकायला काढली असताना दुसरीकडे काँग्रेसनं स्वत:लाच विकायला काढलं आहे. अनेक राज्यांमध्ये लोकांनी काँग्रेसला सत्तेत निवडून दिलं होतं. पण त्यांनी तर स्वत:लाच भाजपाला विकून टाकलं”, अशा शब्दांत विजयन यांनी काँग्रेस आणि भाजपावर टीका केलेली आहे.

६ एप्रिल रोजी केरळमध्ये मतदान

६ एप्रिल रोजी केरळ विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यांमध्ये मतदान होणार असल्यामुळे केरळ, पुद्दुचेरी, आसाम, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या पाचही राज्यांचे निकाल २ मे रोजी लावण्यात येणार आहेत. २९ एप्रिल रोजी पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.

वाचा- आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आमदार लांडगे ‘ऑनफिल्ड’

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button