ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

सुरेश गादीया आणि अमृत पऱ्हाड या माजी नगरसेवकांना भाजपने वाहिली शोकसभेतून श्रद्धांजली !

भाजप मधील या दोन्ही माजी नगरसेवकांचे पक्षातील योगदान हे प्रेरणादायी

पिंपरी : भाजप मधील या दोन्ही माजी नगरसेवकांचे पक्षातील योगदान हे प्रेरणादायी असेच आहे. त्यांच्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीने हा पक्ष उभा राहिला आहे. जुने आणि नवीन कार्यकर्ते यांनी एकत्रित पणे संघटनेची मुठ बांधून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करणे हिच खरी या दोघांनाही श्रद्धांजली ठरणार आहे. असे जिल्हा अध्यक्ष शंकर जगताप यांनी सांगितले. भाजपा परिवारातील एक निष्ठावंत सहकारी गमाविणे हे अत्यंत वेदनादायक आहे. असे महेश कुलकर्णी म्हणाले.

साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले स्वर्गिय सुरेश गादिया यांच्या परिचयात जो येईल त्याचे ते मन जिंकून घ्यायचे. शहरात त्यांनी अनेक माणसे जोडली. जमेल तितकी मदत समोरच्या व्यक्तीला करणे ह्या स्वभावामुळे त्यांचा सगळ्यांनाच आधार वाटायचा असे मत जैन समाजाचे कासारवाडी विभागातील संघटक विलास म्हणाले.

पक्ष संघटना बळकट करणे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. त्यांच्या जाण्याने भाजपाने एक संघटक गमविला, असे मनोगत सदाशिव खाडे यांनी व्यक्त केले. अशा कार्यकर्त्यांच्या जाण्याने पक्षाची प्रचंड मोठी हानी होत आहे. अशी माणसे पुन्हा निर्माण होऊ शकत नाहीत. अत्यंत कठीण प्रसंगात त्यांनी केलेले पक्ष कार्य हे खरोखर कधीही न विसरण्या जोगेच आहे. असे मत अत्यंत जुने कार्यकर्ते नरहरी वाघ यांनी व्यक्त केले.

प्रस्थापित गाववाल्यांच्या कळपात राहून तीन वेळा नगरसेवक होणे हे अमृत पऱ्हाड यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. तर सुरेश गादिया यांच्या सारखा कुशल संघटक आणि एक अत्यंत चांगला मित्र गमावल्याचे प्रचंड दुःख असल्याचे त्यांचे सहकारी कार्यकर्ते अविनाश मोरे यांनी सांगितले.

या प्रसंगी वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रवक्ते राजू दुर्गे, जिल्हा सरचिटणीस नामदेव ढाके, जिल्हा सरचिटणीस अजय पाताडे, प्रदेश सदस्य माऊली थोरात यांनी देखील शोक व्यक्त करून माजी नगरसेवक सुरेश गादीया आणि अमृत पऱ्हाड यांना श्रद्धांजली वाहिली.

त्याच बरोबर भाजपा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) संपूर्ण कार्यकारणीच्या वतीनेही दोघांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. स्व. सुरेश गादिया यांचे काल दु:खद निधन झाले तर अमृत पऱ्हाड यांचे 11 डिसेंबर रोजी निधन झाले होते. याच पार्श्वभूमीवर आज बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता पिंपरी येथील भाजप पक्ष कार्यालयात ही शोक सभा घेण्यात आली होती.

यावेळी, भाजपा जिल्हा अध्यक्ष शंकर जगताप यांच्यासह प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष काळूराम बारणे, वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रवक्ते राजू दुर्गे, सरचिटणीस नामदेव ढाके, अजय पाताडे, उपाध्यक्ष माउली थोरात, विलास पगारिया, महेश कुलकर्णी, अविनाश मोरे, राजेंद्र बाबर, नरहरी वाघ, सुभाष सरोदे, गणेश ढाकणे, देविदास पाटील, रविंद्र नांदुरकर, राजेंद्र शिरसाठ, अमित कांकरिया, सुरेश गादिया, दशरथ शिंदे, स्नेहलकुमार लुणावत, विमल शिंपी, ‍टिलकचंद बच्छवाल, निलेश शिंदे, असरफ पठाण, पल्लवी वाल्हेकर, किर्ती परदेशी, सविता शिवले, माधुरी राऊत, रेखा दुधभाते, अंजली गायकवाड, रोहिणी मांढरे, अमित कुलकर्णी, किशोर साळुंखे, रेखा काटे, सीमा चव्हाण, शशिकांत दुधारे, नितीन काळे, कपिल विश्नोई, अनंत देशमुख, पराग जोशी, ओंकार भोंडवे, विनय मलहोत्रा, करण साळुंखे, सुधाकर काळे, मुकेश चुडासमा, जरिधन पहियार, गणेश गांधी, प्रतिक गाडे, संदिप तांबे, भुषण जोशी, प्रविण राजपुरोहित, नितीन पुरोहित, संजय जहांगिर, भरत जांगिड, अलताफ पिंजारी, डॉ. महेश कुदळे, संदिप गायकवाड, पंकज मुथा, विकी गायकवाड, विजय थोरात, ऍड. अनंता देशपांडे, अमेय देशपांडे आदी उपस्थित होते.

सुरेश गादिया हे भाजपाचे शहर कोषाध्यक्ष होते. त्यानंतर कै. अंकुशराव लांडगे यांचे काळात सरचिटणीस पदावर त्यांनी काम केले. व्यापारी आघाडी प्रदेशावर त्यांची नियुक्ती झाली होती. सध्या भाजपा पिंपरी चिंचवड जैन समाज आघाडीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी त्यांनी स्विकारली होती. जैन श्रावक संघाचे ते चिंचवड स्टेशन विभागाचे अध्यक्ष होते. ही संपूर्ण जबाबदारी सांभाळून त्यांनी पडत्या काळात देखील पक्षाची बांधणी केली, अशा अनेक आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button