भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूचा लौंगिक शोषणाचा आरोप
![BJP MP Brijbhushan Singh accused of sexually abusing a female wrestler](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Brij-Bhushan-Singh-and-vinesh-phogat-780x470.jpg)
डब्ल्यूएफआयला ७२ तासांत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश
पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी
मुंबई : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूने आक्रमक होत लौंगिक शोषणाचा आरोप केला आहे. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत एकही खेळाडू आगामी स्पर्धांमध्ये सहभागी होणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दिल्ली जंतरमंतर मैदानात या खेळाडूंचे निषेध आंदोलन सुरू आहे.
भारतीय कुस्तीपटूंनी केलेले आरोप क्रीडा मंत्रालयाने गांभीर्याने घेतले आहेत. मंत्रालयाच्या वतीने कुस्ती महासंघाला नोटीस पाठवण्यात आली असून, झालेल्या आरोपांवर 72 तासांच्या आत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. डब्ल्यूएफआयला पाठवलेल्या पत्रात मंत्रालयाने म्हटले आहे, हे प्रकरण अॅथलेटिक्सच्या चांगल्याशीच संबंधित आहे. यामुळेच मंत्रालयाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे, महिला कुस्तीपटू विनेश फोगटने बुधवारी रडत रडत, भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह हे अनेक वर्षांपासून महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही, तर त्यांना हटवण्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनीही हस्तक्षेप करावा अशी मागणीही फोगटने केली आहे.
जे खेळाडू महासंघाविरूद्ध बोलतात त्यांच्यावर बॅन लावला जातो. आम्हाला बदल हवा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा मिळून आमच्या समस्येवर तोडगा काढतील अशी आम्हाला आशा आहे, असं कुस्तीपटू बंजरंग पुनिया याने म्हटलं आहे.
बृजभूषण सिंह यांनी आरोपांवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कुणीतरी तर समोर असेल जे सांगेल की बृजभूषण सिंहांनी अमुक एखाद्या खेळाडूनचं लैंगिक शोषण केलं आहे. विनेश स्पर्धा हरली तेव्हाही मी तिला पाठिंबा दिला. तिचं सांत्वन केलं, असं खासदार बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.