भाजपाच्या आमदारांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातल्या रेशीमबाग कार्यालयाला भेट
- परमपूज्य डॉ. हेडगेवार, परमपूज्य गोलवलकर गुरुजी यांच्या समाधीचे घेतले दर्शन
नागपूरः सध्या नागपुरात शिंदे फडणवीस सरकारचे अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे सर्व मंत्रिमंडळ व आमदार सध्या नागपुरात आहेत. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बाग येथील स्मृती मंदिरात आज भाजपच्या आमदारांचा संघपदाधिकाऱ्याकडून अभ्यासवर्ग घेतला जाण आहे. सकाळी 7:30 वाजता या अभ्यास वर्गाला सुरुवात होणार असून, संघाचे जेष्ठ पदाधिकारी आमदारांना संघ परिचय आणि संघ भाजपा समन्वय यावर मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान, दोन तास हा अभ्यास वर्ग सुरु होता. आमदार स्मृती मंदिरमध्ये आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीला पुष्पांजली देखील अर्पण केली. स्मृती मंदिर परिसरात संघाच्या बौद्धिकसाठी आमदार आशिष शेलार, हरिभाऊ बागडे, नितेश राणे सह भाजपचे सर्वच आमदार उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे देखील सहभागी झाले होते. या स्मृती मंदिर परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा बहाल करण्यासाठी नवीन सरकारने प्रयत्न करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.