breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन

वाशिम : वाेशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघातून ते भाजपचे आमदार होते.  देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. पाटणींच्या निधनाने भाजपसह राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला आहे. राजेंद्र पाटणी हे १९९७  ते २००३  या काळात शिवसेनेकडून विधान परिषदेवर आमदार होते. त्यानंतर २००४  (शिवसेनेकडून), तर २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपकडून असे तीन वेळा कारंजा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

हेही वाचा  – ‘बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून..’; मनोहर जोशींच्या निधनावर राज ठाकरे भावनिक

देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’वर  पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली.

ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button