Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

भाजपा स्वतंत्र संघटना, संघाचा कोणावरही रिमोट कंट्रोल नाही; सरसंघचालक मोहन भागवत

Mohan Bhagwat | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही निमलष्करी संघटना नसल्याचे स्पष्ट मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. संघाच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त दोन दिवसांच्या भोपाळ दौऱ्यावर असताना प्रतिष्ठित नागरिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

मोहन भागवत म्हणाले की, संघटनेचा गणवेश आणि शारीरिक कवायती केल्या जात असल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. संघाच्या दैनंदिन दिनचर्येत गणवेश, पथ संचलन आणि काठ्यांच्या कसरती या चारित्र्याला आकार देण्यासाठी केल्या जातात. आम्ही गणवेश परिधान करतो, पथसंचलन आणि काठ्यांच्या कसरती करतो. यावरून जर कुणी संघाला निमलष्करी संघटन मानत असेल तर ते अयोग्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

संघाचे स्वरूप स्पष्ट करताना भागवत म्हणाले की, संघ ही एक अद्वितीय संघटना आहे. संघाचे ध्येय भारतीय समाजाला एकत्र करणे आणि देश पुन्हा कधीही परकीय शक्तीच्या हाती येऊ नये, यासाठी आवश्यक असलेल्या गुणांनी नागरिकांना भारीत करण्याचे काम संघाकडून केले जाते.

हेही वाचा     :      एलॉन मस्कच्या ‘X’ ला केंद्राची नोटीस ! ‘तसा’ कंटेंट काढण्याचे दिले आदेश ; ७२ तासांच्या आत मागितला रिपोर्ट

भारतीय जनता पार्टी (भाजपा), विश्व हिंदू परिषद आणि विद्या भारती यासारख्या संघटना स्वतंत्रपणे काम करतात. या संघटना संघाच्या नियंत्रणाखाली नाहीत. भाजपा किंवा विहिंपच्या माध्यमातून संघ समजून घेण्याचा प्रयत्न करू नका. ते स्वतंत्रपणे काम करतात, ते आमच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाहीत, असे प्रतिपादन मोहन भागवत यांनी केले.

संघ स्वंयसेवकांना तयार करतो, पण त्यांच्यावर कधीही रिमोट कंट्रोल ठेवत नाही. संघ स्वंयसेवकांमध्ये मूल्य, विचार आणि ध्येय रुजवून भारताच्या परम वैभवासाठी काम करण्यास प्रेरित करतो. भाजपा, विहिंप आणि विद्या भारती या संघटनांमध्ये संघाचे स्वंयसेवक आहेत. पण त्यांचे काम त्या त्या संघटनांच्या घटनेप्रमाणे चालते. भारताच्या वैभवासाठी एकत्र काम करणे, हेच सर्वांचे ध्येय आहे, असंही मोहन भागवत म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button