breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

सांगलीत भाजप नगसेवकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये भाजपा नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. विजय ताड असं भाजपा नगरसेवताचं नाव आहे. जत मधल्या सांगोला रोडवरील अल्फोंसो स्कूलजवळ ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जत नगरपालिकेचे भाजपा नगरसेवक विजय ताड यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडून ताड यांची हत्या केली आहे. नगरसेवक ताड हे आपल्या इनोव्हा गाडीतून सांगोल रोडवरील असणाऱ्या अल्फोंसो स्कूल या ठिकाणी आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी आले होते. अज्ञात हल्लेखोरांनी ताडे यांची ईनोवा गाडी अडवली आणि त्यांच्या गाडीवर हल्ला करत ताड यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर डोक्यात दगड घालण्यात आला. ज्यामध्ये ताड यांना जागीच मृत्यू झाला.

मात्र हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून आणि कोण्ही केला आहे हे मात्र समजू शकले नाही,या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आहे. तसेच ताड समर्थकांनी या ठिकाणी मोठे गर्दी केली आहे, तर घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली देखील जतकडे रवाना झाले आहेत. खुनाचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. पोलीस अधिक तपास करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button