महापालिका प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपा उमेदवाराच्या प्रचाराचा होणार ‘‘श्रीगणेशा’’
मिशन – PCMC : विकासकामांच्या मुद्यांवर निवडणुकीच्या प्रचाराचा उद्या शुभारंभ
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपाच्या उमेदवारांनी प्रचार मोहीमेची आघाडी घेतली आहे. उद्या चारही उमेदवारांच्या प्रचाराचा अधिकृतपणे श्रीगणेशा होणार असून, त्यासाठी परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यता आले आहे.
या प्रभागात संत ज्ञानेश्वर नगर (म्हाडा), मोरवाडी, लालटोपीनगर, अमृतेश्वर कॉलनी, इंदीरानगर, सरस्वती विश्व विद्यालय परिसर, आंबेडकर नगर, एच.डी.एफ.सी कॉलनी, दत्तनगर, विद्यानगर, शाहूनगर, वृंदावन सोसायटी आणि संभाजीनगर या भागांत प्रचार रॅली काढून जनता भेटण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी प्रचाराचा शुभारंभ उद्या, शनिवार दि. 27 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता होणार असून हनुमान मंदिर, विद्यानगर पासून रॅली सुरू होऊन रामेश्वर व दत्त मंदिर, संभाजीनगर पर्यंत जाईल, असे कळवले आहे.
प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. भाजपाचे प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार अनुराधा गणपत गोरखे, सुप्रिया महेश चांदगुडे, कुशाग्र मंगला अशोक कदम आणि तुषार रघुनाथ हिंगे यांच्या प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे.
“प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील. प्रत्येक नागरिकापर्यंत विकासकामे पोहचवणे ही आमची प्रमुख जबाबदारी आहे. “प्रभागाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत विकासकामे पोहोचवणे आणि जीवनमान सुधारण्यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील. आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रभागाची प्रगती सुनिश्चित करावी, हीच माझी प्रमुख जबाबदारी आहे, अशी भूमिका भाजपाच्या उमेदवारांनी व्यक्त केली आहे.





