Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
महाराष्ट्रातील पहिला निकाल समोर, भाजपच्या उमेदवाराची बाजी

मुंबई | उत्तर मुंबईतून भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या भूषण पाटील यांचा पराभव केला आहे. मुंबईत ठाकरे गटाने खातं उघडलं आहे. अरविंद सांवत यांनी विजय मिळवला आहे. तर अनिल देसाई यांनीही बाजी मारली आहे.
हेही वाचा – देशातला पहिला निकाल समोर, काँग्रेसच्या उमेदवाराची बाजी
नंदुरबार जिल्हा पहिल्यापासून काँगेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यंदा हा गड काँग्रेसने राखला असून काँग्रेस के. सी. पाडवी यांचे पुत्र अॅड. गोवाल पाडवी यांचा विजय झाला आहे.





