breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

Lok Sabha Election 2024 | पुण्यातील फडके हौद चौक परिसरात भाजपचं आंदोलन

पुणे | कसबा विधानसभा मतदार संघात काँग्रेसचा बॅनर लावून चिठ्ठ्यांचे वाटप होत असल्याचा आक्षेप भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. भाजपचे माजी नगरसेवक हेमंत रासने यांनी याविरोधात आंदोलन केले. त्यामुळे काँग्रेस- भाजप आमने सामने आल्याचे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीत पर्वती विधानसभा मतदारसंघात प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यापुढे आंदेलन केले होते. शहरातील चार विधानसभा मतदारसंघ संवेदनशील जाहीर करण्याची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.

हेही वाचा    –     Lok Sabha Election 2024 | मावळमध्ये ११ वाजेपर्यंत १४.८७ टक्के मतदान 

भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. त्यानंतर आता भाजपकडून आरोप करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय गोंधळ वाढला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button