Kasba Election : रूपाली पाटील यांनी गोपिनियतेचा भंग केल्याचा भाजपचा आरोप
कसब्यात सकाळी ११ वाजेपर्यंत ८.२५ टक्के मतदान
पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. कसब्यात भाजपच्या मुक्ता टिळक यांच्या तर चिंचवडमध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे महाविकास आघीडीने प्रचारात पुर्ण शक्तिपणाला लावली होती.
कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी गोपिनियतेचा भंग केला आहे. त्यांनी मतदानाचा हक्क बजावताना ईव्हीएम मशीनचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी तसंच रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी भाजप नेते धनंजय जाधव यांनी केली आहे.
भाजप नेते धनंजय जाधव यांनी केलेला आरोप रूपाली पाटीस-ठोंबरे यांनी फेटाळून लावला आहे. लोकांनी पाठवलेला फोटो ट्वीट केला असल्यांचं त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीसाठी सकाळी ११वाजेपर्यंत ८.२५ टक्के तर चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकसाठी १०.४५ टक्के मतदान झालं आहे.