Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबईराजकारण

नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात आपलाच मुख्यमंत्री, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील 4 विधानपरिषद निवडणुका पार पडणार आहेत.सध्या राज्यात विधानपरिषद निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर महाराष्ट्र दौरा केल्यानंतर आज संजय राऊत यांनी नाशिकमध्ये जोरदार भाषण केलं. यावेळी, नोव्हेंबरनंतर आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री असेल, असे राऊत यांनी म्हणाले आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदिप गुळवे यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचा मेळावा घेण्यात आला होता यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर महाराष्ट्र दौरा केल्यानंतर आज संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. नाशिकमध्ये मुख्यमंत्री आले होते. त्यांचा आणि शिक्षणाचा सबंध काय आहे का, दोन अडीच वर्षात शिक्षण संबंधी काही बोलले का, मला दाखवा. शिक्षण क्षेत्राचा भाव लावला, हे चुकीचे आहे, असे म्हणत राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. तसेच, त्यांचा उमेदवार म्हणतो शिक्षकांना गुलाम बनवेल. शेतकरी आणि शिक्षक या राज्यात समाधानी नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात आपला मुख्यमंत्री होणार आहे, अशी जाहीर घोषणाही राऊत यांनी नाशिकमधील मेळाव्यातून केली. मात्र, महाविकास आघाडीत अद्यापही मुख्यमंत्रीपदाबाबत काहीही ठरलं नसताना, राऊतांनी केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीमध्ये आणि राजकीय वर्तुळात चर्चा होणार हे मात्र नक्की.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button