ललित पाटील प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा; म्हणाले, ललितला उद्धव ठाकरेंनी..
![Big revelation of Devendra Fadnavis in Lalit Patil case](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Devendra-Fadnavis-1-1-780x470.jpg)
मुंबई : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे समोर येत आहेत. दरम्यान, या प्रकरणाबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत अनेक खुलासे केले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ललित पाटील याला डिसेंबर २०२० ला अटक झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी ललित पाटीलला नाशिक शिवसेना प्रमुख होते. ललित पाटील याला अटक झाल्यानंतर पीसीआर मागितला, गुन्हा मोठा असल्याने १४ दिवसाचा पीसीआर मिळाला. पीसीआर मिळताच ते ससूनला अॅडमिट होते. त्यावेळी सरकारी पक्षातर्फे कोर्टाला अर्ज केला नाही की यांच इंट्रोगेशन केलं नाही.
हेही वाचा – मुंबई, दिल्लीच्या तुलनेत पुण्याची हवा जास्त खराब
शेवटी काही केलं नाही तर त्यांचा एनसीआर करून टाकला. त्यामुळे माझा सवाल आहे की ललित पाटील याची चौकशी का करण्यात आली नाही? कोणाचा दवाब होता, मुख्यमंत्री जबाबदार होते की गृहमंत्री कोणाचे संबंध होते? ललित पाटील नाशिक शिवसेना प्रमुख असल्याने त्याची चौकशी झाली नाही का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.