‘राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊ नये हे आमचं मत होतं’; शिंदे गटातील नेत्याचं विधान
![Bharat Gogawale said that it was our opinion that NCP MLAs should not be taken](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/ajit-pawar--780x470.jpg)
मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला हालचाली सुरू झाल्या आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे गटातील अनेक आमदारांची नावे चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील नेते भरत गोगोवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भरत गोगावले म्हणाले, शिवरायांच्या विचाराने चालणारा मी कार्यकर्ता आहे. ‘लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे’, त्याप्रमाणे आम्हाला जाणीव झाली की, एकनाथ शिंदे अडचणीत आले, तर आमच्या आमदारकीचा उपयोग काय? अशा काही घटना घडतात की, त्या अजरामर होतात. राजकारणात आमची नोंद होऊ शकते.
हेही वाचा – IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया महामुकाबला मोफत पाहता येणार, वाचा..
राष्ट्रवादीच्या ९ आमदारांना मंत्रिपद मिळाल्यानं अन्याय झाला? सरकारमध्ये राष्ट्रवादीला घेण्याची गरज नव्हती? असा सवाल विचारला. यावर ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊ नये हे आमचं आणि भाजपाच्या आमदारांचं मत झालं. पण, पुढच्या राजकारणासाठी टाकलेल्या डावातून हे सर्व घडलं आहे. हे आम्ही समजून घेतलं आहे. अजून १४ मंत्रिपद आहे. यासाठी देवीला साकडं घातलं आहे, असंही भरत गोगावले म्हणाले.