मुंबई, पुण्यानंतर मावळमध्ये लागले अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर
![Banners of Ajit Pawar as the future Chief Minister were put up in Maval](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/ajit-pawar-5-2-780x470.jpg)
पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पुन्हा एकदा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेखाचे बॅनर्स लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार हे आज मावळ दौऱ्यावर असून बैलगाडा शर्यत स्पर्धेला उपस्थिती लावणार आहेत. मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या कार्यकर्त्यांनी हे फलक लावल्याचे सांगण्यात येत आहे. मुबंई, पुणे पाठोपाठ आता मावळमध्येही बॅनर लागल्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरून चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार, हे आता सगळ्यांनी मान्य केलं आहे. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी भविष्यात पुढे येईल, असं सूचक विधान जयंत पाटील यांनी केलं आहे.