Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘महाविकास आघाडीचा काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल’; बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान

Balasaheb Thorat | विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा मुख्य सामना रंगण्याची चिन्ह आहेत. मात्र, असं असलं तरी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रि‍पदावरून उलटसुलट चर्चा सुरु आहेत. यातच, काँग्रेस नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं आहे.

काँग्रेसची कोकण विभागामध्ये जिल्हा निहाय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून चांगलं काम करण्याचं आवाहन मी कार्यकर्त्यांना करतो. मला १०० टक्के खात्री आहे की, महाविकास आघाडीचा काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल. याची खात्री आहे.

हेही वाचा    –      महाविकास आघाडीचे जागावाटपाचे गाडे पुढे सरकेना

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील, असे अनेकदा बोलून दाखवले होते. एवढंच नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे कोणी उमेदवार असेल तर तो त्यांनी सांगावं, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यानंतर आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असं विधान केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button