‘ज्यादिवशी मंत्रीमंडळ विस्तार होईल, त्यादिवशी..’; बच्चू कडूंचं मिश्किल विधान

मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर इतर नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, यावरून भाजप आणि शिंदे गटातील नेते मंत्रीपदावरून नारज असल्याचं वारंवार बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मिश्लिक विधान केलं आहे.
बच्चू कडू म्हणाले की, माझं काय होईल म्हणून चिंता करू नका. बच्चू कडू हा बच्चू कडू म्हणून काफी आहे. आमदार, मंत्रई असो नसो. मला चिंता नाही. मी स्वत: मंत्रीपद नाकारलं. त्यामुळे तो विषय संपला. ज्यादिवशी विस्तार होईल त्यादिवशी मी अमेरिकेत जावून बसणार आहे.
हेही वाचा – वेस्ट इंडिजविरूद्धच्या वनडे सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू मायदेशी परतला
राज ठाकरे यांनी टोलमुक्त महाराष्ट्राचा मुद्दा उपस्थित केला आहे. यावरून बच्चू कडू यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, राज ठाकरेंनी याच्यात उडी घेतली ते खूप चांगलं झालं. राज ठाकरेंचं स्वागत करतो. त्यांनी ही उडी कायम ठेवावी. या उडीतून चांगली निष्पन्न झालं पाहिजे. भांडण्यासाठी कोण ना कोण पाहिजे असतं. सर्व बरोबर असतं असंही नाहीय. मी त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करतो.
हे भाजपचं सरकार नाही ना, शिंदे सरकार आहे ना, त्यामुळे प्रोब्लेम असू शकतो. पूर्ण भाजपचं सरकार नाहीय. तुम्हाला माहितीय की कशाप्रकारे सरकार बनलं आहे. त्यामुळे मोठे निर्णय घेताना काही वेळ द्यावा लागेल. मला वाटतं टोल फ्री राज्य अशी त्यांची भूमिका होती. ती केली पाहिजे. नाहीतर निवडणूक आहेत. लोक त्यांना दणका देणारच, असंही बच्चू कडू म्हणाले.




