ऑरीची साडे सात चौकशी असमाधानकारक उत्तर
252 कोटींचा ड्रग्ज घोटाळा प्रकरण!
मुंबई : सोशल मीडिया (Social Media) इन्फ्लुएन्सर ऑरीच्या (Orry Summoned By Mumbai Police) अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. 252 कोटींच्या ड्रग्ज घोटाळ्या प्रकरणी अँटि नारकोटिक्स सेलनं (Anti Narcotics Cell) ऑरीला समन्स जारी केलं होतं. त्यानंत आज ड्रग्ज प्रकरणात ऑरीची साडे सात चौकशी करण्यात आली आहे. साडेसात तासाच्या चौकशीनंतर घाटकोपरच्या अंमली पदार्थ युनिटमधून ऑरी बाहेर पडला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑरीकडून चौकशीत असमाधानकारक उत्तर मिळाली आहेत. ऑरीचे वकिलही त्याच्या सोबत पहायला मिळाले.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मित्र सलीम डोला हा ड्रग्ज सिंडिकेट चालवत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. या सिंडिकेटनं देशभरातील सात ते आठ राज्यांमध्ये मेफेड्रोन (एमसीएटी), म्याऊ म्याऊ आणि आइस सारख्या ड्रग्जचा पुरवठा केला आणि मोठ्या प्रमाणात परदेशातही त्यांची तस्करी केली आहे.
हेही वाचा – ‘पालिका क्षेत्रातील विकासासाठी सरकारच्या मोठ्या योजना’; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
नेमकं प्रकरण काय?
आरोपीने दावा केला की त्याने यापूर्वी नोरा फतेही, श्रद्धा कपूर आणि तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर, झीशान सिद्दीकी, ओरी उर्फ ओरहान, अब्बास मस्तान, लोका आणि इतर अनेकांसोबत भारतात आणि परदेशात ड्रग्ज पार्ट्या आयोजित केल्या होत्या. आरोपीने असेही कबूल केले की तो या पार्ट्यांमध्ये वैयक्तिकरित्या सहभागी झाला होता आणि या आणि इतर व्यक्तींना ड्रग्ज पुरवत होता. पोलीस आता या दाव्यांची चौकशी करत आहेत आणि या संदर्भात ओरीला समन्स बजावण्यात आले आहे. ओरी ही एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे जी अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत वेळ घालवताना दिसते.
नोरा फतेहीने दिले स्पष्टीकरण
ड्रग्ज प्रकरणात तिचे नाव अडकल्यावर नोरा फतेहीने स्पष्टीकरण दिले. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर लिहिले, “तुमच्या माहितीसाठी, मी पार्ट्यांमध्ये जात नाही. मी सतत काम करत असते. मी अशा लोकांशी स्वतःला जोडत नाही. जर मी वेळ काढला तर मी दुबईतील माझ्या घरी किंवा माझ्या जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवणे पसंत करते. लोकांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. राहीजण खोटे बोलत आहेत. लोक माझे नाव कलंकित करत होते, तेव्हा मी गप्प राहिलो.” पण आता माझे फोटो आणि नाव ज्या गोष्टींशी माझा काहीही संबंध नाही त्या गोष्टींपासून दूर ठेवा.




