Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘पालिका क्षेत्रातील विकासासाठी सरकारच्या मोठ्या योजना’; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शहर सुधार योजना राबविणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या विकास योजना राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीत भाजपा उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

राज्यातील छोटी छोटी शहरे आणि गावे विकासाचा संकल्प भाजपाने सरकारच्या माध्यमातून घेतला आहे. तसेच पुढच्या पाच वर्षांमध्ये एकही पैसा शेतकऱ्यांना विजेच्या देयकाचा भरावा लागणार नाही असेही बावनकुळे यांनी या वेळी सांगितले.

वाई पालिका निवडणुकीतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बावनकुळे बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपा नेते मदन भोसले, सुनील काटकर, सुरभी भोसले, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल सावंत यांची भाषणे झाली.

हेही वाचा –  महेश मंडळातर्फे चिंचवड येथील शाळेला संगणक भेट

बावनकुळे म्हणाले, सध्या केंद्र आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपाचे सरकार आहे. पंतप्रधान मोदी यांनी शहर विकासासाठी व छोटी छोटी शहरे विकासासाठी ५५ प्रकारच्या विकास योजना आणल्या आहेत. या सर्व योजना वाई शहरात राबविण्यासाठी भाजपा नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल सावंत आणि नगरसेवक पदासाठी असणाऱ्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

भारताच्या विकासाचा संकल्प भाजपाने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील छोटी छोटी शहरे आणि गावे विकासाचा संकल्प केला आहे.

पुढच्या पाच वर्षांमध्ये एकही पैसा शेतकऱ्यांना विजेच्या देयकाचा भरावा लागणार नाही. हा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांना आत्महत्याकडे जाऊ द्यायचं नाही. याकरता येणाऱ्या ३० जून २०२६ पर्यंत महाराष्ट्रातल्या गरीब शेतकऱ्याचा कर्जमाफीचा निर्णय सरकार घेणार आहे. खऱ्या अर्थाने सरकार कर्जमाफी देणार आहे.

यावेळी भाजपा नेते मदन भोसले यांनी शहर विकासातील अडचणी व शहर विकासाची गरज विशद केली. अनिल सावंत यांनी नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष म्हणून कामकाज करत असताना शहर विकासासाठी राबवलेल्या अनेक योजना आढावा घेतला. नागरिकांच्या मूलभूत सेवा सुविधांसाठी कोणत्या योजना राबविल्या, हे सांगितले. शहराध्यक्ष विजय ढेकाने यांनी आभार मानले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button