breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण
नांदेड सिटी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी अतुल कारले
पुणे | प्रतिनिधी
रोटरी क्लब इंटरनॅशनलच्या ११७ व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड सिटीमधील उद्योजक, वकील, डॉक्टर, अध्यापन, व्यावसायिक, शासकीय अधिकारी, माहिती तंत्रज्ञान, क्रीडा, अध्यात्मिक आदी क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित उपस्थितीत नांदेड सिटी रोटरी क्लबची स्थापना करण्यात आली असून प्रथम अध्यक्ष म्हणून नांदेड सिटीचे संचालक अतुल कारले यांची निवड करण्यात आली.
अतुल कारले हे राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून पुणे राष्ट्रीय तालीम संघ सदस्य आहेत. नांदेड सिटीमधील नागरिकांच्या सहभागातून निश्चितच सामाजिक कामाचा आलेख उंचावला जाईल. मिळालेल्या संधीच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे अतुल कारले यांनी सांगितले.