Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

ठाण्यातील भाजपाचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

ठाणे : ठाण्यातील वर्तकनगर येथील महात्मा फुलेनगप भागात भाजपाचे युवा मोर्चा उपाध्यक्ष धनंजय बिस्वाल यांचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

घटना घडली त्यावेळी कार्यालयात कोणीही नव्हते, असे भाजपाचे युवा मोर्चा उपाध्यक्ष धनंजय बिस्वाल यांनी सांगितले आहे. घटनेता प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनंजय बिस्वाल यांचे कार्यालय घराच्या पहिल्या मजल्यावर आहे. पहाटे पाट वाजताच्या सुमारास अचानक कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फुटल्याचा आवाज त्यांना आला. त्यामुळे ते कार्यालयात शिरले असता, एक व्यक्ती त्यांच्या कार्यालयामध्ये रॉकेल ओतत होता. बिस्वाल यांना पाहताच त्याने बाहेर पळ काढला. त्यानंतर तो व्यक्ती रस्त्याकडेला उभ्या असलेल्या त्याच्या एका साथिदारासोबत पळून गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी बिस्वाल यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button