breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पवारसाहेबांच्या सूचनेनं मुख्यमंत्रिपद, पवारसाहेब, सोनियाजींनीही विश्वास ठेवला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील सत्तानाट्यासंदर्भात फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सेनेचे बहुतांश आमदार गेले आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Facebook live ) यांनी काल मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी थेट फेसबुक लाईव्ह करत राज्यातील जनतेशी संवाद साधण्याचा निर्णय घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

माझा आवाज कमी असेल तर तो करोनाचा परिणाम आहे. बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, मी बोलणार आहे. करोनासारख्या भयानक संकटाशी आपण लढलो. मला प्रशासन माहिती नव्हती, मात्र येत्या दोन तीन महिन्यात करोना आला, आपण त्याला तोंड दिलं. सुरुवातीच्या पहिल्या काही महिन्यांमध्ये जो सर्व्हे आला त्यामध्ये पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझा समावेश होता, असं उद्धव ठाकरे म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून काही विषय प्रसारमाध्यमांतून समोर येत होते. मुख्यमंत्री भेटत नव्हते हे काही दिवसांपर्यंत खरं होतं. माझी शस्त्रक्रिया झाल्यानंतरच्या दोन तीन महिन्यानंतर मी कुणाला भेटत नव्हतो. मात्र, आता मी अनेकांना भेटत होतो. रुग्णालयातून दुसऱ्या खोलीतून ऑनलाईन बैठक घेतली, असं उद्धव ठाकरेंनी सांगितंल.

शिवसेना आणि हिंदुत्व एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासह अयोध्येला जाऊन आले. विधानसभेत हिंदुत्वावर बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन २०१२ मध्ये निधन झाल्यानंतर आपण २०१४ मध्ये एकटे लढलो होतो. प्रतिकूल स्थितीत आपण ६३ जण निवडून आणले. त्यावेळी जे मंत्री झाले ते आता देखील मंत्री आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून मी मुख्यमंत्री आहे. आता देखील काही जण मंत्री आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
विधानपरिषदेची निवडणूक झाली त्यापूर्वी मी हॉटेलमध्ये गेलो. मी त्यावेळी ही काय लोकशाही आहे का विचारलं होतं. मला काहीही अनुभव नसताना मला जी जबाबदारी मिळाली होती ती जिद्दीनं पार पाडली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आपण २५ ते ३० वर्षांपासून लढत आलो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं विशेषता: पवार साहेबांनी तुम्हाला घ्यावी लागेल, असं सांगितलं. आमच्याकडे आणि तुमच्याकडे लोक ज्येष्ठ आहेत. मात्र, तुम्हाला मुख्यमंत्रिपद स्वीकारावं लागेल, असं सांगितलं. पवार साहेबांनी आणि सोनिया गांधी यांनी विश्वास टाकला. कोणताही अनुभव नसताना मला संधी देण्यात आली, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button