चिंचवड पोटनिवडणूक अपडेट : वीसाव्या फेरी अखेरीस अश्विनी जगताप १० हजार ९२ मतांनी आघाडीवर
![At the end of the twentieth round, Ashwini Jagtap is leading by 10092 votes](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Bypoll-Election-Pimpri-Chinchwad-2-780x470.jpg)
पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी ही निवडणूक विशेष प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे आजच्या निकालाकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.
वीसाव्या फेरी फेरी अखेरीस अश्विनी जगताप १० हजार ९२ मतांनी आघाडीवर
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत सतराव्या फेरी अखेरीस भाजपच्या अश्विनी जगताप यांनी लीड कायम ठेवलं आहे. जगताप यांना ७७४९३ तर नाना काटे यांना ६५७७५ तर अपक्ष राहुल कलाटे यांना २४१९३ मते मिळाली आहेत.
सतराव्या फेरी फेरी अखेरीस अश्विनी जगताप १०८५१ मतांनी आघाडीवर
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत सतराव्या फेरी अखेरीस भाजपच्या अश्विनी जगताप यांना ६१४७३ तर नाना काटे यांना ५०६२२ तर अपक्ष राहुल कलाटे यांना १९४०५ मते मिळाली आहेत.
पंधरावी फेरी अखेरीस अश्विनी जगताप ८४६४ मतांनी आघाडीवर
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत पंधराव्या फेरी अखेरीस भाजपच्या अश्विनी जगताप यांना ४९२३९ तर नाना काटे यांना ४०७७५ तर अपक्ष राहुल कलाटे यांना १४९६४ मते मिळाली आहेत.
अकरावी फेरी अखेरीस अश्विनी जगताप आघाडीवर
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत अकराव्या फेरी अखेरीस भाजपच्या अश्विनी जगताप यांना ३९९१८ तर नाना काटे यांना ३११९४ तर अपक्ष राहुल कलाटे यांना १२२४५ मते मिळाली आहेत.
नवव्या फेरीअखेरीस अश्विनी जगताप आघाडीवर
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत नवव्या फेरी अखेरीस भाजपच्या अश्विनी जगताप यांनी लीड कायम ठेवलं आहे. जगताप यांना ३२२८८ तर नाना काटे यांना २५९२२ तर अपक्ष राहुल कलाटे यांना १०७०५ मते मिळाली आहेत.