कसबा पेठ पोटनिवडणूक अपडेट : भाजपाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी!

पंधराव्या फेरी अखेरीस रवींद्र धंगेकर ६००७ मतांनी आघाडीवर
पुणे : २८ वर्षं भाजपाच्या हाती असलेल्या कसबा मतदारसंघात मविआकडून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी मुसंडी मारत पंधराव्या फेरीअखेरपर्यंत ६००७ मतांची आघाडी घेतली आहे. त्यांना आत्तापर्यंत ५६४९७ मतं मिळाली आहेत.
पंधराव्या फेरी अखेरीस रवींद्र धंगेकर आघाडीवर
कसबा पेठ पंधराव्या फेरी अखेरीस रवींद्र धंगेकर २३०८० मतं मिळवत ६००७ मतांनी आघाडीवर आहेत. तर हेमंत रासने ५०४९० आणि आनंद दवे १०० मते मिळाली आहेत.
तेरावी फेरी अखेरीस रवींद्र धंगेकर ५०८६ मतांनी आघाडीवर
कसबा पेठ तेरावी फेरी अखेरीस रवींद्र धंगेकर ४९९१२० मतं मिळाली आहेत. यासह धंगेकर ५०८६ मतांनी आघाडीवर आहेत. तर हेमंत रासने ४४०३४ आणि आनंद दवे १२१ मते मिळाली आहेत.
कसबा पेठ बारावी फेरी अखेरीस रवींद्र धंगेकर ४५६३८ मतं मिळाली आहेत. यासह धंगेकर ५००० मतांनी आघाडीवर आहेत. तर हेमंत रासने ४०७६१ आणि आनंद दवे १२१ मते मिळाली आहेत.
दरम्यान, कसब्यात भाजपाचा विजय शिवसेनेमुळेच होत होता, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. कसब्यात भाजपाचा विजय हा नेहमी शिवसेनेच्या पाठिंब्यानंच होत आला. आज शिवसेना मविआची घटक आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत. त्याचा परिणाम तिथे दिसतोय. चिंचवडमध्ये तर भाजपाला शेवटपर्यंत घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. तिथे तिरंगी लढत आहे. आम्ही अपेक्षा ठेवून आहोत, संजय राऊत यांनी म्हटले आहे.





