विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं! निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर
![Assembly polls in Maharashtra will be held on November 20, while the results will be held on November 23](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Maharashtra-Assembly-Election-2024-1-780x470.jpg)
Maharashtra Assembly Election 2024 | महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. २० नोव्हेंबरला एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहेत. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्राच्या निवडणुकीचं वेळापत्रक :
महाराष्ट्रात एका टप्प्यात मतदान
22 ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याची तारीख
29 ऑक्टोबर अर्ज मागे घेण्याची तारीख
30 ऑक्टोबर अर्ज छाणणी
4 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची तारीख
20 नोव्हेंबर रोजी मतदानाची तारीख
23 नोव्हेंबर रोजी निकाल
288 जागांसाठी किती मतदार असतील?
एकूण मतदार – 9 कोटी 63 लाख
नव मतदार – 20.93 लाख
पुरूष मतदार – 4.97 कोटी
महिला मतदार – 4.66 कोटी
युवा मतदार – 1.85 कोटी
तृतीयपंथी मतदार – 56 हजारांहून जास्त
85 वर्षावरील मतदार – 12. 48 लाख
शंभरी ओलांडलेले मतदार – 49 हजारांहून जास्त
दिव्यांग मतदार – 6.32 लाख
महाराष्ट्रात किती मतदान केंद्र असणार?
एकूण मतदान केंद्र – 1 लाख 186
शहरी मतदार केंद्र – 42,604
ग्रामीन मतदार केंद्र – 57,582
महिला अधिकाऱ्यांची केंद्रे –
एका मतदान केंद्रावर सरासरी मतदार – 960