आसाम मतदान! यादीत मतदार ९०; प्रत्यक्ष मतदान मात्र १७१!
आसाम |
आसामच्या दिमा हसाओ जिल्ह््यातील एका मतदान केंद्रामध्ये केवळ ९० पात्र मतदारांची नोंद असताना तेथे प्रत्यक्षात १७१ जणांनी मतदान केल्याचे उघड झाल्याचे सोमवारी अधिकाऱ्यांनी सांगितले. हाफलाँग मतदारसंघात हे मतदान केंद्र असून तेथे १ एप्रिल रोजी मतदान झाले, हाफलाँगमध्ये ७४ टक्के मतदान झाले. हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याने या मतदान केंद्रावरील पाच निवडणूक अधिकाºयांना निलंबित केले आहे.
खोतलीर एलपी शाळा १०७(ए) या मतदान केंद्रावर फेरमतदान घ्यावे, असे जिल्हा अधिकाऱ्याने प्रस्तावित केले आहे. तथापि, या ठिकाणी फेरमतदान घेण्याबाबतचे आदेश अद्याप जारी करण्यात आलेले नाहीत. या मतदान केंद्रावरील मतदार यादीत ९० जणांची नावे होती, परंतु प्रत्यक्षात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये १७१ जणांनी मतदान केल्याची नोंद झाली, असे अधिकाºयांनी सांगितले. ग्रामप्रमुखाने मतदार यादी योग्य असल्याचे मान्य करण्यास नकार दिला आणि स्वत:च मतदारांची यादी आणली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
वाचा- दुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई